abus

About Isha Paramedic Holistic Health Foundation

1. In Isha Paramedical we are offering an opportunity for franchisee & we expect an individual should be spiritually wise & should be aware of mystic knowledge or eager to be aware of mystic knowledge & also an Individual person should be Holistic & Religious with their Harmony.

2. With the coordination of Isha we are taking an efforts to sow logical mystic knowledge with full of universal energy force in an Individual brain, mind & body. So that with this Dynamic Knowledge any Human being could live life blessed with an energy. We are encouraging Holistic Health i.e. Health which contains Holy Energy

3. Also we are encouraging people to be Holistic Master & Fitness, Wellness Experts. They could work for their society and counsel people around them. Isha prays for your Holistic Health.

संस्थेची उद्दिष्टे – ईशा पॅरामेडिक होलिस्टिक हेल्थ फाउंडेशन पुणे

१. या संस्थेच्या माध्यमाने अध्यात्म, आरोग्य आणि समाज विवेक जागृत करणे. अध्यात्म विकास, आरोग्य विकास, समाजविवेकाचा विकास, समाजातील विविध स्तरांवर रुजवण्याचा उद्देश या संस्थेच्या माध्यमाने सिद्ध करीत आहोत.

२. त्याचप्रमाणे समाजकार्यासाठी संस्थेने तयार केलेल्या अभ्यासक्रमाद्वारे उत्तम समुपदेशक तयार करणे. होलिस्टिक मास्टर्स तयार करणे. आरोग्य मार्गदर्शक तज्ञ तयार करणे हा उद्देश आहे.

३. “मानवता हाच खरा धर्म” या विचाराने संस्थेच्या उद्दिष्टच्या माध्यमातून ‘अभ्यासक्रमाद्वारे’ “मनुष्य हा प्रथम मानवतेचा मार्ग चालणारा मग, साधक व शिष्यरूपी प्रवर्तक असून प्रत्येक मनुष्य या पृथ्वीचे व निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी जन्मला आहे” असा विवेकसंपन्न व्यक्ती न व्यक्ती तयार करणे.

४. समाज कार्य संस्थेकडून मुख्यत्वे करून १६ ते २० वयोगटातील अनाथ मुला मुलींचा विचार केला जाईल व त्यांना स्वबळावर उपजीविका करून पायावर उभे राहण्यासाठी अनुदानातून मदत केली जाईल.

५. अनुदान देणाऱ्या/ देणगी देणाऱ्या सर्व समाजातील व्यक्तींना -

  • आरोग्याचा व योगशक्तीचा ठेवा.
  • अध्यात्म व विज्ञानाची अमुल्य शक्ती.
  • उत्तम उपजीविका व प्रतिष्ठा.
  • समाजामधून किर्ती व प्रसिद्धी.
  • मनाजोग्या शांती, समाधानी व समृद्धीने परिपूर्ण अशी अद्वितीय जीवन पद्धती.

इत्यादी सर्व गोष्टी प्रदान करून त्या प्रत्येक व्यक्तींना ऋषीतुल्य घडवणे हा उद्देश आहे. त्यामुळे समाजाला ऋषीतुल्य प्रवर्तक मिळतील व भारताची ऋषी परंपरा आधुनिक पद्धतीने जपण्याचा हा संस्थेचा उद्देश आहे.

६. विविध क्षेत्रात संशोधनाचा प्रसार व प्रचार करून. विविध विभागात Holistic Masters नेमून त्यांच्या कडून काही सुधारणा घडवून आणण्याच उद्देश आहे.

संस्थेच्या महत्वकांक्षी अपेक्षा

  • विविध समाजप्रवर्तक संस्थाकडून
  • समाज अधिकारी संस्था / व्यक्तींकडून
  • नामवंत व अधिकारी व्यक्तींकडून
  • विविध स्तरांमधून अनुदान/ देणगी मिळवणे

व त्याबद्दल/ त्यानिमित्ताने संस्थेने तयार केलेले अभ्यासक्रम व विविध मूल्यात्मक योजना राबवणे. त्या सर्व अनुदान/ देणगी कर्त्यांसाठी संस्थेचा अमुल्य ठेवा देणे.

विस्तार क्षेत्र – पुणे व संपूर्ण महाराष्ट्र