wtl-one
 • हात पाहून मार्गदर्शन, कोणत्याही आरोग्य व कौटुंबिक प्रश्नाचे.
 • हात पाहून, past life addressing, पूर्वजन्म मिमांसा...
 • Past life Self processing alo, स्वतःचा स्वतः पूर्वजन्म पाहणे
 • 9 मिनिटे मेडिटेशन
 • रेकी हिलींग, आणि ऑरा ऑपेरेशन.
 • वैदिक रेकी (जीवनातील एक सत्य)
 • Yearly Service.

Come & get clarity for your Achievements.

नमस्कार, मी, सौ. वेदांगी बाळकृष्ण जोशी , हस्तरेषातज्ञ (पामेस्ट्री स्पेशालीस्ट) आहे.

हस्त्सामुद्रिक शास्त्राचे वेगवेगळ्या दृष्टीकोना मधून अध्ययन करणे हा माझा अल्पस्वल्प असा उपक्रम आहे. पामेस्ट्रीचा अभ्यास परंपरागत तसेच अनेकविध दृष्टीने केला असता, त्या मधील अनेक पैलू लक्षात आले. व आणखीन ही काही खोलवर ज्ञान उलगडते आहे हे समजले. यासाठी मात्र काही गुढज्ञानाची मदत घ्यावी लागेल. जसे की, “मानवी शरीराच्या भोवतीचे वलय” (ऑरा रिडींग) तसेच “मानवी मेंदू व मन:पटलाचे समीकरण” (ब्रेन मॅपींग), “शिवस्वरोदय” “पॅरामेडीक योगा / पॅरामेडीक उपचार”(क्वान्टम तत्वानुसार निसर्गोपचार) .


“आयुष्याचे तत्वज्ञान” साधना……. प्रायोगीक साधना………..व……सिध्दता या तत्वांनुसार मनुष्याचे पूर्वकर्म व ईच्छाशक्ति यांच्यामधील मर्म उकलण्यास त्या त्या व्यक्तिला स्वत:च स्वत:ची मदत होते. व त्यानंतर हस्त लक्षणे सर्व प्रकारे आपण स्वत:च बदलवू शकतो.यासाठी यामध्ये एक शास्त्राधार दिसून येतो. तसेच हे प्रायोगीक स्तरांवरही सिध्दं होते. मात्र यासाठी पुढील गोष्ट लक्षात घेऊन सिध्दता होणे शक्य आहे. ती म्हणजे, “संकल्प हा चैतन्याचा असतो व ईच्छाशक्ति ही मनाची असते.”


 • ऑरा रिडींग करुन व हस्तरेषांद्वारे आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. ६ महिन्य़ांनंतर होणारे आजार/व्याधींचे संभाव्य निदान करून घेतल्याने, तुम्ही तुमच्या आयुष्यातील आरोग्या विषयीचे धोके टाळू शकाल. पूर्ण श्रध्देने त्यावर उपचार केल्यास आरोग्यवान आयुष्याचा आनंद घेता येणे शक्य आहे.
  यासाठी, ईशा पॅरामेडीक हेल्थ च्या संयोगाने………….. पॅरामेडीक योगा / उपचार व काही विषेश उपचार करून दिले जातात.

 • ब्रैन मॅपींग द्वारा व हस्तरेषांद्वारा “सुप्रिम लाईफ थेरपी” – करिअर ओरीएंटेड / महत्वाकांशी / समाजासाठी झटणा-या लोकांसाठी / सर्व लोकांच्या आयुष्यात स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा ठसा कायम करणे / मी कोण हे ब्रह्मांड कसे आहे माझे ईहजन्मीचे उद्दीष्ट काय? किंवा गुढज्ञानातून स्वत:च्या आत्मतत्वाचा शोध घेऊ पहाणा-यांसाठी एक सुंदर कोर्स “ सुप्रिम लाईफ थेरपी ”

 • हस्तरेषां द्वारे


हस्तसामुद्रिक विद्या ही विज्ञानाची शाखा आहे. या विद्येचा आयुष्यात खासच उपयोग होतो. आयुष्यातील अनेक घटना समजून घेऊन त्याचा योग्य तो लाभ किंवा फायदा करून घेण्यासाठी हस्तसामुद्रिक शास्त्राचा उपयोग होऊ शकतो. हे अनुभव सिद्ध आहे.


या शास्त्रावरील आक्षेप असा की, हातावरील रेषा बदलतात. याचे निरसन असे करता येईल की, हातावरील मुख्य रेषांचा मार्ग कधीही बदलत नाही. परंतु त्यातून वर जाणाऱ्या किंवा खाली जाणाऱ्या रेषांमध्ये फरक पडू शकतो. आयुष्यातील मार्ग कशापद्धतीने आक्रामिला जाणार आहे, हे मुख्य रेषांवरून समजते व त्यात होणारे छोटे मोठे बदल हे या उमटणाऱ्या किंवा नाहीशा होणऱ्या रेषांवरून समजते. हिंदू तत्वज्ञानानुसार पूर्वकर्म व इच्छाशक्ती यामध्ये सतत झगडा चाललेला असतो. पूर्वकर्मानुसार विचारांची निर्मिती होऊ शकते, परंतु त्या विचारांप्रमाणे वागायचे किंवा नाही हे इच्छाशक्तीच्या जोरावरच ठरवावे लागते. एकदा गुन्हा करण्याचा विचार मनात येणे हे पूर्वकर्मानुसार होत असते, परंतु त्याप्रमाणे वागणे न वागणे हा इच्छाशक्तीचा प्रांत आहे. पुढे काय घटना होण्याची शक्यता आहे याचा अंदाज हातावरून करता येतो. परंतु आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे येणारा धोका टाळता येणे शक्य आहे. हातावरील रेषांवरून येणारी संधी आपण फायदा करून घेऊ शकतो किंवा होणारे नुकसान टाळू शकतो.


हस्तसामुद्रिक या शास्त्राला आधार आहे, काही तत्वे आहेत, काही परंपरा आहेत, धर्मग्रंथ, पुराणा मधूनही या शास्त्राला आधार आहे. इतकेच नव्हे तर वैद्यकीय शास्त्रातसुद्धा या शास्त्राला महत्व दिले गेले आहे. हातावरील रेषा व मेंदूचे कार्य यांचा घनिष्ठ संबंध असावा असा वैद्यकीय शास्त्राचा शोध आहे.


हातावरून प्रकृतीचे निदान उत्तम पद्धतीने करता येणे शक्य आहे. मानसशास्त्राचा अभ्यास हातावरून चांगल्या पद्धतीने करता येतो तसेच कमी बुद्धीची मुले हातावरून शोधता येतात व त्यांच्या बुद्धीचा विकास व्हवा म्हणून योग्य ते उपचार करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हातावरून गुन्हेगारी वृत्तीही समजण्यास मदत होते व त्याबाबत फार मोठे संशोधन करण्यासारखे आहे. थोडक्यात, डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यास, पालक व शिक्षण तज्ञांना मुलांना योग्य तो शिक्षणक्रम निवडण्यास, मानस तज्ञांना मानसिक विकृती शोधून त्यांना योग्य उपचार देण्यास, किंबहुना सर्वच क्षेत्रातील मर्म अध्ययनास हस्तसामुद्रिक उपयुक्त ठरते.